पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
शहरातील ऐतिहासिक लाल महाल चौकात ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्रित येत दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच अनेक मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होतात. यामुळे बालन ग्रृप व ३५ मंडळांनी एकत्रित येत एकाच ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शहरातील चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन हा ताण टाळण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळा’चे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत.