पुणेः लोहगाव येथील पुणे आतंरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनाने या नावाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्राकडून होकार आल्यानंतर या नावावर अंतरिम शिक्का मोर्तेब होईल. हे एकीकडे होत असताना दुसरीकडे स्वारगेट ते पिंपरी चिंचवड (swarget to pimpari metro) मेट्रो दरम्यान येणाऱ्या महात्मा फुले मंडई स्थानकाला केवळ मंडई नाव दिल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
स्वारगेट ते पिंपरीचिंचवड भूअंतरर्गत मेट्रो मार्गकेचे काम घाईने करुन केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असल्याने उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. येथील महत्मा फुले मंडई स्टेशनला मंडई असे नाव देण्यात आल्याने या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील वास्तू, त्यांची नावे, परंपरा, मेट्रोने कायमच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. तसेच मेट्रोन पुलांची उंचीही कमी ठेवली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मेट्रोचे काम होत असताना डिपीआर तयार करताना सर्वांगीन विचार होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.