जेजुरीः राज्यात २८८ मतदार संघात मतमोजणीला सुरूवात झाली असून पुरंदर विधानसभेसाठी देखील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या सहा फिऱ्यांमध्ये विजय शिवतारे हे आघाडीवर असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यांना आतापर्यंत २५ हजार १०४ मते मिळाली असून, संजय जगताप यांना १६ हजार ७५९ मते मिळाली आहेत. तर संभाजीराव झेंडे यांना ९ हजार ६१४ मते मिळाली आहेत. यावरून असे दिसते की शिवतारे हे आघाडीवर आहेत.