बारामतीः विधानपरिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी एका जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली होती. त्यांनी खालच्या शब्दांमध्ये केलेल्या टीकबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी खोत यांनी पवारसाहेबांबद्दल केलेले विधान अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. सदाभाऊ यांनी देखील माध्यमांशी बोलताना शरद पवार विषयी केलेल्या विधानबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, बारामती शहरात खोत यांच्या विधानाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. यापुढे जर पवार साहेब यांच्या बद्दल अशी विधाने केली तर बारामती आणि उभ्या महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी निषेध म्हणून निषेधकर्त्यांनी आपल्या हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या.
शहरातील नगरपरिषदेसमोर एकत्रित येत हा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच युतीसरकार विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. ही त्यांना शेवटची संधी येथून पुढे जर पवार साहेबांवर अशा अत्यंत खालच्या पातळीत टीका कराल तर बारामतीकर खपवून घेणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदाभाऊ खोत यांनी काल जाहीर सभेत पवार साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांमध्ये टीका केलेल्या आम्हा सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत. पवार साहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे.