सदर महिला वारंवार जाणुन बुजुन वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा दोन्ही समाजाचा आरोप
सकल मराठा समाज भोर तालुक्याच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगेपाटील यांचे विरोधात भोर शहरा मधील एक महिलेने फेसबुक वर वादग्रस्त पोस्ट टाकली होती.त्यामुळे तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या विरोधात संपूर्ण सकल मराठा समाज्याचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधित महिले विरोधात पोलीस स्टेशन मध्ये रितसर कायदेशीर तक्रार दाखल करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक करपे यांच्या कडे देण्यात आले आहे .
सदर महिला वारंवार सोशल मीडियाचा वापर करून मराठा समाज व मुस्लिम समाजाच्या भावना वादग्रस्त पोस्टने दुखावत आहे आपण महिला असल्याने आपणास कोणी काही करू शकत नाही अशा ती भ्रमात बेताल वक्तव्य करत आहे. त्यामुळे सदर महिलेला वेळीच आवर घालण्यासाठी भोर मधील मराठा व मुस्लिम या दोन्ही समाजाच्या वतीने सदर महिलेचा निषेध करत या महिले विरोधात भोर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष संजय भेलके, महिला अध्यक्ष सीमा तनपुरे, जयश्री शिंदे,स्वाती गांधी , सारंग शेटे, सोमनाथ ढवळे, आप्पा मळेकर, स्वामी धुमाळ, यशवंत डाळ, संदिप शेटे, महेश शेटे, विनायक तनपुरे हे मराठा समाज बांधव बघिणी तर मुस्लिम समाजाचे निसारभाई नालबंद, सादिक फरास, इम्रान आतार, तौसिफ आतार, परवेझ शेख , अहमद खान,असिफ मणेर, तबरेज खान, साजिद खान असे असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.