Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

लोणी काळभोर: ‘अग्निविरां’मुळे समाजातील शिस्त वाढेल: निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांचे प्रतिपादन

'एमआयटी एडीटी' विद्यापीठात स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत उत्साहात साजरा

by SBPRNL
August 15, 2024
लोणी काळभोर: ‘अग्निविरां’मुळे समाजातील शिस्त वाढेल: निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांचे प्रतिपादन

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे

पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचे आहे. भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. अग्निविर योजनाही त्याचाच भाग आहे. भारताच्या प्रतिष्ठीत सैन्यात सेवा देऊन जेव्हा हे ‘अग्निवीर’ समाजात परततील तेव्हा, समाजातील शिस्त आणि समतोल देखील वाढेल. परिणातः देशातील भावी पिढी अधिक शिस्तप्रीय व जबाबदार होण्यास मदत होईल. तसेच देशप्रेम हे एक दिवसीय असू नये तर ते वर्षभर कार्यरत असावे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांनी केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

यावेळी, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डाॅ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ. सुनीता कराड, नीता पिंगळे, प्र. कुलगुरू डाॅ. रामचंद्र पुजेरी, डाॅ. अनंत चक्रदेव, डाॅ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी उपस्थित होते.

डाॅ. कराड यावेळी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथवर पोचलो आहोत. त्यामुळे, स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यविरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी, कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवं. अशात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी युवकांना कौशल्यात्मक शिक्षण पुरवून नवे स्टार्टअप्स उभारणीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात यंदाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी क्रीडा स्पर्धांत विद्यापीठाला पदक मिळवून देणाऱ्या प्रा.आदित्य केदारी व प्रांजली सुरदुसे हिचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार ‘मॅनेट’च्या कॅडेट्सतर्फे करण्यात आले.

‘स्वातंत्र्याची सायकल यात्रा’ मोहिम

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ. सुराज भोयार यांच्या पुढाकाराने “स्वातंत्र्याची सायकल यात्रा” या हरित व नशामुक्त भारताचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला यावेळी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेताना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी रोज सायकल चालविण्याचे आवाहन व संदेश दिला.

Tags: independentdaymitlonikalbhorPune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
पुणेः राष्ट्रवादी पक्षातर्फे संविधान प्रस्तावना वाचन अभियान; तत्वे आणि मूल्यांचे रक्षण करण्याची घेतली शपथ

पुणेः राष्ट्रवादी पक्षातर्फे संविधान प्रस्तावना वाचन अभियान; तत्वे आणि मूल्यांचे रक्षण करण्याची घेतली शपथ

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group