Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

….आता विद्यमान आमदारांना घरी बसवणारच! सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंवाद यात्रेदरम्यान इशारा

श्री मांढरदेव, लोहारे, बोपर्डी, पिराचीवाडी येथील नागरिकांशी साधला संवाद, जनसंवाद मेळाव्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

by Team Rajgad Publication
October 9, 2024
….आता विद्यमान आमदारांना घरी बसवणारच! सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंवाद यात्रेदरम्यान इशारा

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

वाई: तालुक्यात निधी कोणीही आणला तरी, याचे श्रेय विद्यामान आमदारच घेतात. असे म्हणत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा प्रवृत्तींना आपण वेळीच रोखले नाही, तर आपण गुलामगिरीत जाऊ असे प्रतिपादन शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले. तसेच वाई -खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात गेली 50 वर्षे होऊन अधिक काळ राजकारणात तीच ती घराणी सत्ता भोगत  आहेत.

राजकीय कुरघोड्या करणाऱ्या विद्यमान आमदारांची राजकारणातील घराणेशाही संपविण्यासाठीच माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील व्यक्ती विधानसभेच्या मैदानात उतरला असून, मतदारसंघातील सर्वांचीच मोठी साथ मिळत आहे. आता परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला. श्री मांढरदेवी काळुबाई, लोहारे, बोपर्डी, पिराचीवाडी येथील संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.

आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे कट्टर शिवसैनिक आहोत. संघर्ष आमच्या नसा नसात भिनला आहे, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आम्हा शिवसैनिकांना टोकाचा विरोध करणारे विद्यमान आमदार आता मात्र शिवसेना आमच्या सोबतच असल्याचा खोटा कळवळा आणत असल्याची टीका जाधव यांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक विद्यमान आमदाराला आता घरी बसवणारच, असा इशारा जाधव यांनी दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे वाई व महाबळेश्वर तालुक्यात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी दिला आहे. मात्र विद्यमान आमदाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विकास कामाच्या उद्घाटन ,भूमिपूजन करताना मुख्यमंत्री यांचे साधे नाव देखील बोर्डावर टाकले जात नाही यांची खंत आम्हा शिवसैनिकांना आहे.

मांढरदेव पुरुषोत्तम जाधव यांचे आजोळ असल्याने या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मांढरदेव सरपंच रेश्मा मांढरे, गोरख मांढरे ,तसेच सर्व बाजारपेठेतील व्यापारी लहुजी शक्ती सेनेचे सर्व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रविवार पेठ वाई येथे सर्व देवी भक्त ,वाई तालुका संघटक युवराज अण्णा कोंढाळकर , बाळासाहेब जाधव लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष , शिवसेना वाई विभाग प्रमुख प्रताप भिलारे, भूषण शिंदे,सचिन धायगुडे,भानुदास जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: rajgadnewssatara
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
जेजुरीत हरियाणा विजयाबद्दल भाजपकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष

जेजुरीत हरियाणा विजयाबद्दल भाजपकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group