शिक्रापूर: शेरखान शेख
शिक्रापूर परिसरातील अनेक भागात साथींच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून, डेंगू या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिक्रापूरमधील अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने ग्रामपंचयात प्रशासनाकडून ही फवारणीची कामे सुरू केली आहे.
शिक्रापूर परिसरामध्ये सध्या स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होत असताना अनेक ठिकाणी गवत वाढले असून, पाण्याचे डबकी तयार झालेली आहे. यामुळे डासांच्या उत्पतीमध्ये वाढ होऊन याचा उपद्रवामुळे काही नागरिकांना डेंगू आजाराने ग्रासले आहे. तर अनेक नागरिकांना डेंगू सदृश आजाराची लक्षणे दिसून येत आहे. गावातील अनेक रुग्णालयात डेंगूसदृश आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, राहुल राजगुरु, योगेश केवटे यांच्या माध्यमातून गावामध्ये सर्वत्र फवारणी करुन गाव निर्जंतुकीकरण करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. तर गावामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायतने वेळीच पावले उचलली असल्याने नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहे.