राजगड न्युज (संपादकीय)
खंडाळा : पोलीस खात्यातील कर्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यापासून ते शिपाई पर्यंत सर्वांना सर्वसाधारण माणूस देवदूताच्या नजरेतून पाहत असतो . ग्रामीन भागातील सामान्य नागरिक पोलीस आपल्या अडचणी सोडवणारा देवदूत म्हणूनच आपल्या अडचणी घेऊन जाऊन त्यांच्यापुढे मांडतो. कर्तव्य निभावणारा जनतेचा सेवक असणारे पोलीस कर्मचारी व काही निवडक अधिकारी त्यांच्या अडचणी देखील जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात.
खंडाळा तालुक्यातील स्वतंत्र पोलीस स्टेशन असलेल्या शिरवळ पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी सामान्य व्यक्तीच्या अडचणी सोडवण्यात अग्रेसर असतात तर त्या अधिकाऱ्याचा निराळाच ठेका असून जनसामान्य व्यक्तीवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून “चोर सोडून, संन्याष्याला फाशी?”, मी म्हणेल तीच पूर्व दिशा असे प्रकार करणाऱ्या व असे म्हणणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर जनमानसात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
शिरवळ पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा तालुक्यातील सुमारे २८ गावे येतात या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या देखील असून याच पोलीस स्टेशन मध्ये सुमारे १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ उप पोलीस निरीक्षक आणि ४५ पोलीस अंमलदार काम करत असतात या २८ गावातील व्यक्ती आपल्या अडी अडचणी घेऊन या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतात. इतर कर्मचारी प्रामाणिक पणे आपले कर्तव्य करतात परंतु या एकाच अधिकाऱ्याचा हेकेकोर पणा सामान्य माणसा बरोबर कर्मचाऱ्यांचे देखील मानसिक खच्चीकरण करीत आहे. तपासाच्या नावाखाली सामान्य व्यक्तीला त्रास देण्याचा ठेका या अधिकाऱ्याने उचलला असून गुन्हेगारांना पाठींबा देण्याचे काम मात्र प्रामाणिक पणे होत असल्याची चर्चा चौका चौकात होत आहेत. पोलीस स्टेशन मध्ये आर्थिक फायदा असणारे गुन्हे मात्र स्वतः कडे तपासाला घेऊन इतर सहकारी अधिकाऱ्याला कमी लेखून त्रासदायक असणारे गुन्हे तपासाला देण्याच्या डाव मात्र खेळला जातो. आलेला गुन्हा हा प्रामाणिक पने न करता तक्रार दारालाच आरोपी असल्याची वागणूक मात्र न विसरता दिली जाते.कामात येणारा ताण तणाव इतर कर्मचाऱ्यांबरोबर तक्रार देण्यास येणाऱ्या व्यक्तीवर देखील काढला जातो. सामान्य व्यक्ती बरोबर तरुण वर्ग तर हा अधिकारी आपल्याला एखाद्या गुन्ह्यात गुंतवेल या भीतीने तर पोलीस स्टेशन आवारात येणे देखील टाळतो.
एका गुन्ह्यातील फिर्यादीला तर १ वर्ष हेलपाटे मारायला लावले आणि त्यातील गुन्हेगार तर मोकाट फिरत असल्याबाबत देखील चर्चा नागरिकांत आहे.
काही गुन्ह्यात चौकशी करण्याच्या लिस्ट तर मोठ्या बनवल्या जातात परंतु आर्थिक तडजोडी? नंतर त्या लिस्ट कचऱ्याच्या डब्यात मात्र जाताना नक्की पहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीने याबद्दल विचारणा केली असता साहेबांचा आदेश आहे आपले यात काही नाही म्हणून साहेबांच्या मागे दडण्याच काम मात्र केले जाते. या अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे पोलीस स्टेशन व कर्मचाऱ्यांकडे सामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलला आहे. त्या अधिकाऱ्याकडे फक्त “चोर सोडून,संण्याष्याला फाशी” देण्याचे काम सुरु असल्याची चर्चा असून काही दिवसात वरिष्ठांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रमश: