सनी पटेल,बारामती
बारामती : रविवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती दौरा आटपून सांगवी येथील सरकारी दवाखान्याच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांवर “दुकाने बंद करा” अशी दमदाटी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती होते याचवेळी सांगवी या ठिकाणी सरकारी दवाखान्याच्या उद्घाटनासाठी जाणार होते यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथीलच व्यापाऱ्यांना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आपली व्यवसाय आणि आपले दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केलेला चा प्रकार उघडकीस आला आणि हे घडत असताना एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहरांने या बाबत विचारले असता वार्ताहरास उलट सुलट बोलत मी तुझ्याशी बोलत नाही मी त्या दुकानदाराच्या मालकाशी बोलतोय अशी दमदाटी केली तसेच मी त्या दुकानदार मालकाशी 10 मिनिटाच्या आत दुकाने बंद करण्याचे सांगून बंद करत नाहीस अशाप्रकारे दुकानदारांनाही देखील दम देण्यात आला.
या सर्व घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त झालेले पाहायला मिळत आहे. कालचा दिवस हा रविवारचा दिवस असल्याने सुट्टीचा दिवस असतो यामुळे मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळते. या आधीही अजितदादा पवार असतील यांनी वेळोवेळी आपल्या सभेत बोलताना सांगितले आहे कि आपल्या मुळे कोणत्याही सामान्य जनतेला व सामान्य व्यापारी वर्गाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे असे दादा नेहमी त्यांच्या शब्दात सूचना देत असतात.
तरी पण बारामती तालुक्यातील संवेदनशील व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं गाव म्हणून सांगवी हे गाव ओळखले जाते आणि याच गावात असा प्रकार यामुळे सांगवी गावातील व्यापारी वर्गात प्रचंड नाराजगी असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन जो वाहतूक पोलीस कर्मचारी आहे त्याची सखोल चौकशी करून त्या संदर्भात शिस्त भंगाची कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे आता सांगवी गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.