पिंपरीः पुणे शहरासह पिंपरी चिंचवड भागात दररोजी गुन्हेगारीसंबंधीच्या घटना घडताना दिसत आहेत. एकप्रकारे गुन्हेगारीने येथे डोके वर काढले असल्याचे समोर आले आहे. यातच येथील बिल्हिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची दोन अल्पवयीन मुलांनी धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मुह्मद सैपन बागवान (वय १६) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची मंगळवारी रात्री मासाहेब मीनाताई ठाकरे मार्गाजवळ धारधार शस्त्राचा वापर करून निर्घूणपणे हत्या केली. मंगळवारी रात्री काही अल्पवयीन मुले एकत्र जमली होती. त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून आपापसात वाद झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी दोघांनी सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने मुहम्मद याची हत्या केली. यानंतर तेथून त्यांनी पळ काढला. मात्र, निगडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्यांना जेरबंद केले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.