धुळेः येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीने पेनाचे टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, चिमुरडीच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्या आली असून, अर्चना युवराज खैरनार असे या घटनेत मयत झालेल्या सात वर्षांच्या चिमुरडीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील जिल्हा परिषद शाळे निमखेडी येथे इयत्ता पहिलीत शिकणारी अर्चना युवराज खैरनार या चिमुरडीने पेनाचे टोपण गिळले. हे पेनाचे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकल्याने तिचा श्वास कोंडला गेला. मात्र, अर्चनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्चना तिच्या आजोबांकडे निमखेडी येथे शिकण्यासाठी आली होती. शाळा सुरू असतानाच तिने पेनाचे टोपण गिळले. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते बाहेर काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, पेनाचे टोपण श्वसननलिकेत रुतून बसल्यामुळे ते काढता आले नाही. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.