शिंदे गट शिवसेना तालुक्यात मजबूत करणार!
पेण प्रतिनिधि(किरण बांधणकर)
पेण : लोकप्रिय कार्यसम्राट शिंदे गट शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होते गावा गावातील तरुण वर्ग शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करत आहेत तर जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखेचे उद्घाटन करण्यात येत असून वरिष्ठांच्या आदेशाने कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
नुकतीच हमरापुर येथील रोहन अनंत म्हात्रे यांची हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सूचनेनुसार युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पेण तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना शिंदे गट शिवसेना पक्ष संघटन पेण तालुक्यात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बरोबरच बळकट करून संघटना वाढीचे काम करणार असल्याचे
रोहन म्हात्रे यांनी सांगीतले.