पारगांव (धनाजी ताकवणे) : दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीला काहि दिवसापूर्वीच मोठे पूर येऊन गेले आहेत याच पुराच्या पाण्यात (दि .२६ जुलै)ला प्रथम रांजणगाव साडंस काठावर तेथील स्थानिक शेतकऱ्यांना मगर आढळून आली.हि घटना ताजी असतानाच पारगांव येथे (दि.१० शनिवार) पुन्हा भली मोठी मगर आढळून आल्याने मच्छिमार व नदीपट्ट्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
(दि.१०) रोजी सायंकाळी पारगांव पुलापासून पूर्वेला सुनील शेळके, व नवनिर्माण न्यास यांचे शेती जवळच नागरगांव येथील मच्छिमार अक्षय बरडे, किसन जाधव,व इतर मच्छिमार मासे पकडत असताना नदीपात्रात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला लाकडी ओंडक्या सारखे येत असलेले मच्छिमारांना दिसल्याने हे सर्वजण आपली होडी घेऊन त्या दिशेला गेले असता जवळ पाण्यामध्ये भली मोठी मगर त्यांनी पाहिली हि मगर त्यांच्या दिशेने येऊ लागल्याने मात्र मच्छिमारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि आपला जीव मुठीत घेऊन जोराच्या प्रयत्नाने होडी नागरगाव बाजूला नदी काठावर घेत होडीतुन बाहेर उड्या मारल्या आणि भेदरलेल्या स्थितीत सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.व तातडीने हि बाब सर्वांनी नदीकाठच्या नागरगाव,नानगांव,पारगाव परिसरातील मच्छिमारांना फोन करून माहिती दिली असल्याचे पारगाव येथील मच्छिमार भानुदास शिंदे यांनी सांगितले. दौंड तालुका फॉरेस्ट अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधता त्यांनी ताबडतोब संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना करून,नदीकाठच्या शेतकरी व मच्छिमारांनी खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. तसेच नदीपात्रात असे काही संशयास्पद जलचर आढळ्यास ताबडतोब संपर्क साधावा असे वनरक्षक हिरेंद्र लंकेश्वर यांनी आवाहन केले.