इंदापूरः गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) आपल्या हाती तुतारी घेणार अशी चर्चा रंगली होती. तसेच पाटील यांना इंदापूरच्या जागेसाठी कार्यकर्ते तुतारी हाती घ्या, असे सांगत होते. यावर इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणारा माणुस या चिन्हावर लढणार असे जवळपास पक्के झाले आहे. याचे कारण म्हणजे खुद्द हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतील शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेटी त्यांची घेतली आहे. यामुळे त्यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा करणेच बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुतीमधून इंदापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी येथे आयोजित केलेल्या सभेतून दिले होते. त्यामुळे पाटील हे नाराज झाले होते. अनेकवेळा त्यांनी आपल्या नाराजी मीडियाच्या माध्यमातून व्यक्त देखील केली होती. तालुक्यात त्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांचे भावी आमदार असे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत.
मुलाने ठेवले तुतारीचे स्टेटस
पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या नावाची घोषणा करणे केवळ बाकी आहे. यातच त्यांच्या मुलाने आपल्या व्हॅाटसॅप स्टेटर तुतारी फुंकणारा माणूस ठेवले आहे.