भोर (प्रतिनिधी :इम्रान आत्तार) : रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी डेरेदार वडाच्या झाडाची तोड करत असताना झाडांची फांदी कामगाराच्या अंगावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ( दि.५) रोजी दुपारी चारच्या सुमारास पंढरपूर – महाड रस्त्यावर घडली. यामध्ये नितीन तानाजी पिलाणे ( वय ३०) ( रा. महुडे बुद्रुक ) हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंढरपूर – महाड रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरु असताना यामध्ये भल्ला मोठ्या झाडाची तोड करण्यात येत आहे. भोर – रामबाग रोडच्या हद्दीत सुमारे दोनशे ते अडीसे वर्षाचे असणारे एकाच वृक्षाची तीन झाडे तयार झाले . या डेरेदार वृक्ष तोडणीचे काम ठेकेदाराकडून केले जात होते. त्यांच्या जवळील असणारा कामगार नितीन पिलाणे हा क्रेन मध्ये उभा राहून त्या झाडाची फांदी कटरच्या सहाय्याने कापत असताना फांदीचा अंदाज त्याला आला नसल्याने ती फांदी क्रेनच्या बकेटवर पडून बकेट तुटून तो रस्त्यावर कोसळला . त्याला भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना तो गंभीर जखमी असल्यामुळे त्याचे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्या असल्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजून वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तर
मांढरदेवी काळुबाई याञेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक या मार्गावरून जात असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटना स्थळी भोर पोलिस स्टेशनचे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.














