दत्तात्रय कोंडे|राजगड न्युज
खेड – शिवापूर (वार्ताहार) दि.28 :- त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्रीमंत जय गणेश मित्र मंडळ (बाग) खेड शिवापूर यांनी अनोखी पौर्णिमा साजरी केली. व्हॉलीबॉल च्या सम्पूर्ण ग्राऊंडला दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील त्रिपुरी पैर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र साजरी होते.
हा उत्सव विशेष करून शिवमंदिरांमध्ये साजरा होतो.
आजच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.
त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त पुणे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा झाला. श्रीरामनगर येथील नागेश्वरी मंदिर, खेड येथील खुलेश्वर मंदिर व शिवापूर येथील काशीविशवेशश्वर मंदिरांसह तसेच शिवगंगा खोऱ्यातील इतर मंदिरात देखील हा उत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिर परीसर पारंपारीक पणत्यांसह विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.तसेच अनेक भक्तांनी मंदिरांमध्ये जाऊन त्रिपुरी पौर्णिमा साजारी केली.