खंडाळा : तालुक्यातील अतिट या ठिकाणी दिं.३० रोजी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
तत्पूर्वी या विकासकामांसाठी पुरुषोत्तम जाधव यांनी पाठपुरावा केल्याने सदर कामे मंजूर झाली होती, त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अतिट येथील मंडाई मंदिर परिसर सुशोभीकरण, स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण तसेच चव्हाण वस्ती ते गाडे खिंड रस्त्याचे डांबरीकरण या कामांचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थ सुखावले.
या कार्यक्रमासाठी अतिट ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली जाधव, उपसरपंच गणेश मांढरे, माजी उपसरपंच शारदा जाधव, ग्रामपंचायत सदस्य तानाजी जाधव, मंगेश गुरव, ग्रामपंचायत सदस्या सुनीता चव्हाण, सुषमा चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.