प्रतिनिधी -कुंदन झांजले
गरबा, दांडियाचे आयोजन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
भोर : शहरातील जवाहर जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ, शेटेवाडी चौपाटी हे गेली १० वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्रौत्सव साजरा करीत आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील रविवार (दि.१५) घटस्थापना करत ढोल ताशाच्या गजरात देवीची मिरवणुक काढत शिवतीर्थ चौपाटी येथे पर्यावरण पुरक दुर्गामाता देवीच्या मूर्तीची स्थापना केली .या शारदीय नवरात्रौत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारच्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
आपल्या हिंदू धर्म ,संस्कृती,परंपरेचा वारसा जपत येथील महिलांनी बाईपण भारी देवा या कार्यक्रमाद्वारे मंगळागौर साजरी केली.तसेच गरबा दांडिया खेळत देवीचा जागर केला.यामध्ये शिवतीर्थ चौपाटी व शेटे वाडीतील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता.तसेच हा कार्यक्रम पहाण्यासाठी भोर शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील महिलांनी एकच गर्दी केली होती. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव तसेच इतरही सणावाराला जवाहर तरूण मंडळ नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असल्याने या मंडळाचे भोर शहरात विशेष कौतुक होत आहे.