बारामतीः येथील गणेश मार्केडमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर गगणाला भिडलेला असून, भाजी विक्रेत आणि ग्राहक या दोघांनी शेवग्याच्या शेंगीकडे पाठ फिरल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. आज दि. ३ नोव्हेंबरी या भाजी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा सरासरी एका दर तब्बल ४०० रुपये किलो असून पावशेर शेवगा १०० ते १२० दराने विकला जात आहे. यामुळे येथे शिवगा विक्री व खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. पावसाळ्यामुळे शेवग्याच्या शेंगीचे आवक कमी झाली होती. त्यामुळे शेवगा महाग झाल्याचे शेवगा विक्रत्यांनी सांगितले. तसेच सरासरी शेवगा हा १० किलो विकला जातो. आठवडे बाजाराच्या दिवशी २० किलो शेवग्याची विक्री होत असते. आज मात्र, कोणीही शेवगा घ्यायला तयार नसल्याचे विक्रेत्यांने सांगितले.
शेवग्याची चव नको
भाजी मंडईत गेल्यानंतर विविध भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येतात. यामध्ये मटकी, फ्लॅावर, पालक, भेंडी, बटाटा, आदी पण या सगळ्यात शेवग्याची शेंगी काहीशी गायब झाल्याचे आजच्या दिवशी पाहिला मिळत आहे. यामुळे ग्राहकांनी देखील शेवग्याची खरेदीकडे पाठ फिरवली असून शेवग्याची चव नको असे ग्राहकांनी सांगितले.