Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नसरापूरमध्ये हिप्नॉटिझम करून दिवसाढवळ्या लूट; ६५ वर्षीय महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण व अंगठी लंपास

by SBPRNL
July 24, 2025
नसरापूरमध्ये हिप्नॉटिझम करून दिवसाढवळ्या लूट; ६५ वर्षीय महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण व अंगठी लंपास

नसरापूर (प्रतिनिधी) — नसरापूर परिसरात गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिप्नॉटिझम करून एका ६५ वर्षीय महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीने मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण व हातातील अंगठी असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लुटलेली महिला कमल शिवाजी रेणुसे (वय ६५, रा. नसरापूर, ता. भोर) असून त्या रोजच्या प्रमाणे त्यांच्या हरदेव हॉटेल व्यवसायाकडे जात असताना प्रथम श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर पडताच मास्क घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबवले. स्वतःला जैन समाजाचा असल्याने मंदिरात जात नसल्याचे सांगत त्याने महिलेला ९०० रुपये मंदिरात दान करण्याची विनंती केली.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

महिलेने त्याच्यासोबत दान करण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर आरोपीने त्यांना दुचाकीवर बसवून बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराजवळ नेले. तेथे हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली त्यांच्याकडील सोन्याचे गंठण व अंगठी लंपास केली. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित माने यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल करून तपासाचा वेग वाढवण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
भविष्यवेधी शिक्षणासाठी उत्रौली शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

भविष्यवेधी शिक्षणासाठी उत्रौली शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group