पारगाव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे)
नानगाव ग्रामपंचायत येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा देखील सन्मान करण्यात आला. तालुक्यातून उत्कृष्ट काम करणारे राजेंद्र खोमणे यांना “आदर्श पत्रकार” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजेंद्र खोमणे हे गेली वीस वर्ष आपल्या निर्भीड आणि दृढ निश्चयाने पत्रकार क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणाऱ्या दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार म्हणून या भागात चांगलेच परिचित आहेत.
कोण आहेत राजेंद्र खोमणे?
पत्रकार क्षेत्रात त्यांनी एखाद्या विषयावर मालिका बनवली, तर ती न्याय मिळेपर्यंत त्या बातमीच्या मुळापर्यंत जाऊन सडेतोड आपली भूमिका मांडत असतात. यात वैद्यकीय व आरोग्य या विषयावरती तर राजकीय, प्रदुषण, पूरस्थिती, भ्रष्टाचार निर्मूलन, अंधश्रद्धा, शैक्षणिक बाबतीत ग्रामीण भागातील सर्वांत मोठा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न या विषयावर ज्या त्या खात्यातील अधिकाऱ्यांना निर्भीडपणे प्रश्न विचारून आपल्या दैनिक वृत्तपत्राच्या बातमीतून न्याय मिळवून व वाचा फोडणारे राजेंद्र खोमणे हे दौंड तालुक्यातील नानगाव या ठिकाणी सर्वांचे लोकप्रिय आहेत. इतिहासाचा गाडा अभ्यास असणारे आणि तरुण वर्गाला गड कोट, किल्ले व भ्रमंती याविषयी मार्गदर्शन करत असतात.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य अॅड.अशोक खळदकर, सरपंच स्वप्नाली शेलार, माजी उपसरपंच संदीप खळदकर, माजी सरपंच सी. बी. खळदकर, विश्वास भोसले, भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, अॅड. नंदकिशोर गुंड, बाळासाहेब गुंड, चंद्रकांत सुपेकर, शेखर खळदकर, विकास शेलार, विष्णु खराडे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.