Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन

मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी, भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती व मुख्यमंत्री यांच्या सोबत दोन दिवसांत बैठकीचे आयोजनः केसरकरांचा शब्द

by SBPRNL
September 25, 2024
मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन

मुंबई: भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने 23 सप्टेंबरला संवाद यात्रेचा समारोप येथील गोवंडीमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील 5000 पेक्षा अधिक भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीने २८ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संवादयात्रेला सुरूवात केली होती. त्याची सांगता येथे झाली.

You might also like

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

कलेचे सादरीकरण

मुंबई येथील आरबीके मैदानावर राज्यातील सर्व जिल्ह्यातून हजारो भटके विमुक्त आदिवासी बांधव, ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक, संसाधने याचा विचार न करता आपले हक्क, अधिकार व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. सकाळच्या सत्रात भटके विमुक्त समाजातील गारूडी, गोंधळी, किंगरीवाले, कडकलक्ष्मी, जादुगार, वासुदेव, पोतराज, किन्नर, आराधी समुहातील कलाकारांनी आपली कला, गीते व कौशल्य सादर केले. त्यांच्या या कलेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

अनुभवाचे कथन 

त्यानंतर भटके विमुक्त आदिवासी समुहातील मान्यवरांनी आपापले मनोगत सादर केले. तर राज्यव्यापी संवादयात्रेत सहभागी झालेल्या भावना वाघमारे, बाबुसिंग पवार, संतोष जाधव यांनी आपला अनुभव सांगितला. पहिल्या सत्रामध्ये उमाताई जाधव,मुनीर शिकलगार, संतोष चव्हाण व देवीदास हादवे यांनी सुत्रसंचलन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये समाजशास्त्र अभ्यासक डॉ. अंजली मायदेव, मानव हक्क आयोगाचे सचिव नितीन पाटील, भटके विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड, मकबूल वलांडीकर, अब्दुल रज्जाक शेख, शिवदास शिंदे, सुंदरसिंग चव्हाण हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

शिक्षणमंत्र्यांकडून मागण्याचे आश्वासन 

मुख्यमंत्री कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अॅड. अरुण जाधव, मुमताज शेख व शैला यादव यांनी आपली भूमिका व मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चेचा अहवाल यावेळी सादर केला.  शिक्षणमंत्री डॉ. दिपक केसरकर यांनी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची बैठक दोन दिवसांत बोलवून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

भटके विमुक्त आदिवासी समाजाचे दु:ख, वेदना वनवास, मंत्रालयाच्या वेशीला टांगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, जनगणना नागरिकत्वाची पुरावे, स्वतंत्र बजेट, सुरक्षा या वेदनेचे गाठोडे घेऊन राज्यातील सर्वदूरहून हजारो भटके विमुक्त आदिवासी बांधव मोठ्या विश्वासाने व उत्सुकतेने मुंबईत दाखल झाले होते. गेल्या ७७ वर्षांतील वनवास संपवण्यासाठी भटके विमुक्तांनी कंबर कसली असून, आता थांबायचे नाही, या निर्धाराने भटके विमुक्त आदिवासी राज्यव्यापी संवादयात्रेचा समारोप करण्यात आला.

Tags: dipakkesarkarmumbairajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
राजगड सहकारी साखर कारखान्याची ‘या’ दिवशी पार पडणार अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; मा. मंत्री अनंतराव थोपटे, आ. संग्राम थोपटे यांची असणार प्रमुख उपस्थिती

राजगड सहकारी साखर कारखान्याची 'या' दिवशी पार पडणार अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; मा. मंत्री अनंतराव थोपटे, आ. संग्राम थोपटे यांची असणार प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group