मुंबईः ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर नव्या सरकाराचा शपथविधी समारंभ होणार आहे. या संमारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, काही बेड्या नेत्यांनी समारंभास्थळाची पाहणी देखील करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाला असला तरी त्यांची नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. अशातच आता विधानसभेतील गटनेता ठरविण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षकांचे पथक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहेत. या पथकात विजय रुपानी आणि निर्मला सितारामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामुळे आता विधानसभेतील गटनेता निवड आणि महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर अंतरिम शिक्का हे दोन निरीक्षक पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन ठरवणार आहेत. यामुळे आता मंत्रीमंडळासाठी चर्चेत असणाऱ्या नावांत कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सितारामन या अर्थमंत्री असून रुपानी हे गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.