भोर: तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संतांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक तसेच ह.भ.प. कु. सुप्रिया शिरवले यांचे कीर्तन झाले. गुरुकुलमाऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट यांची कीर्तनस साथ लाभली. यावेळी नाभिक समाजातील ३० गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे, भाजप तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाघ, सचिव शरद पवार, उपाध्यक्ष विकास शिर्के, महिला अध्यक्ष नंदा साळुंके, वैशाली पवार, चित्रा उल्हाळकर, जनाबाई पालकर, सदस्य रविंद्र पालकर, गणेश शेडगे, संतोष उल्हाळकर, मनोज शेडगे, संतोष शिंदे, विशाल दळवी, संतोष तावरे, संजय जाधव, बाळू शिंदे, सागर उल्हाळकर, प्रवीण घोडके सागर यादव, मा. अध्यक्ष दत्ता वाईकर, बाबुराव तावरे, शशिकांत पालकर, शिवाजी राऊत, गणेश पवार प्रकाश शिंदे, दिपक पालकर, गणेश पालकर तसेच समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पवार यांनी केले, तर आभार शशिकांत वाघ यांनी मानले.