भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील आंबाडे ता.भोर येथे चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी बंद घर फोडून तांब्याची भांडी, हांडे, बंब, बत्ते व इतर असे एकूण १ लाख रुपयांचे ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
आंबाडे ता.भोर येथे शिरवळ येथून दादासो आनंदराव मोरे यांच्या घरातील फर्निचर पिकअप गाडीतून आणले सदर फर्निचर आणताना शिरवळ मधील दोन कामगार होते. फर्निचर खाली करताना हे अज्ञात कामगार इकडे तिकडे पहात संयशी असल्याचे त्यांना भासले होते दोन दिवसांनी चोरी झाल्यावर या अज्ञात कामगारांनीच चोरी केली असेल असा संशय मालक दादासो मोरे यांना आल्याने त्यांनी तात्काळ भोर पोलिसांमार्फत शिरवळ येथे संबंधित कामगारांनाबाबत चौकशी केली असता पिकअप गाडीवरील कामगार यांच्या शिरवळ परिसरातील घरी चोरी केलेला ऐवज असल्याचे सापडले परंतु चौकशी करताना चोरट्यांना पोलिसांचा व चोर शोधत असल्याचा सुगावा लागल्याने चोरटे पोलिसांच्या हाती न लागताच पसार झाले.
चोरीचा ऐवज काही तासात मिळाला असला तरी चोरटे पळून गेल्याची घटना घडली आहे अशी माहिती मिळाली आहे.