भोरः कुंदन झांझले
भाटघर व वीर धरणग्रस्त बाधित झालेल्या गावांना विविध नागरी सुविधा पुरविणे यासाठी प्रदीर्घ काळापासून आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून रस्ते, स्मशानभूमी, बस थांबे, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक स्वच्छतागृह ,अशा नागरी सुविधा कामांसाठी प्रशासकीय मंजुरी आणली असून या मंजूर झालेल्या दोन्ही धरणग्रस्त गावातील विकासकामे लवकरच होणार असून या कामांचे श्रेय उगाच कोणीही घेऊ नये, ही विकास कामे फक्त आणि फक्त आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली असल्याचे भोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शैलेश सोनवणे यांनी सांगितले.
भाटघर तसेच वीर धरणग्रस्त नागरी सुविधा कामांना मंजुरी मिळविण्याकरिता दोन्ही प्रकल्पग्रस्त समितीत्यांनी सुरुवातीच्या काळापासून ग्रामपंचायतींचे ठराव, प्रस्ताव घेणे, गावात अंतर्गत पाहणी करून विकास कामांची आखणी करणे, संबंधित विभागाला वेळोवेळी कागदपत्रके देणे, त्यांचा पाठपुरावा करणे, आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेणे, अधिकाऱ्यांना गावातील कामांचा आराखडा देणे अशी सर्वच कामे थोपटे यांच्याकडून पाठपुरावा करत मंजूर झालेली आहेत. असेही दोन्ही प्रकल्पग्रस्त समितीतील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रायरेश्वर विकास डोंगरी परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे, तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भाटघर धरणग्रस्त प्रकल्प समिती अध्यक्ष विठ्ठल वरखडे, वीर प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष रोहण बाठे, सचिव महेश टापरे, काळूराम मळेकर, माऊली दानवले, अनिल डोंबे, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, बारे खुर्दच्या सरपंच सुनिता गायकवाड व व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
श्रेयवादाची लढाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत शिवतरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून आज झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व काँग्रेस पक्ष यांच्या धरणग्रस्त प्रकल्प नागरी सुविधा मंजूर विकास कामांबाबत श्रेयवादाची लढाई तालुक्यात सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. .