भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या गाव भेट दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावेळी थोपटे यांनी येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी पुरातत्व विभाग व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, भूतोंडे व लव्हेरी माजगाव येथे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राची उभारणी करून आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली. भाटघर धरण प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून धरणग्रस्तांना खापर पंतूपर्यंत प्रकल्पग्रस्त दाखले मिळवून देण्यात आले. याचा शासकीय सेवेत भरतीसाठी अनेकांना लाभ झाला. १८ नागरी सुविधा अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये गावागावात सभामंडप, रस्ते काँक्रिटिकारण, स्मशानभूमी करण्यात आल्याची माहिती थोपटे यांनी दिली.
या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने दोन्ही तिर जोडण्यासाठी नवीन पुलाची मागणी केली आहे. महत्त्वाचा असलेला संगमनेर-माळवाडी-हर्णस-जोगवडी-मळे-भुतोंडे या रस्त्याचे काम तब्ब्ल २४ कोटी निधी उपलब्ध करून मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मानसिंग धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल वरखडे, विठ्ठल आवाळे, काळूराम मळेकर, वसंतराव वरखडे, सुवर्णा मळेकर, अंकुश खंडाळे, सागर सुके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.