पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे शेवाळ येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील एका हॅाटेलसमोर टिळेकर यांचे मामा उभे असताना त्यांच्या समोर एका चार चाकीतून आलेल्यांनी त्यांचे अपहरण केले आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली असून अपहरण झालेल्यांचे नाव सतिष वाघ असून त्यांचा शोध घेण्याचे काम हडपसर पोलीस करीत आहेत.
आमदार टिळेकरांचे मामा सतिष वाघ हे शेवाळ वाडीतल्या एका हॅाटेलसमोर सकाळच्या सुमारास उभे होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात अपहरण झालेले वाघ यांचा शोध घेण्याचा तपास सुरू आहे.