भोरः राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक मा. मंत्री अनंतराव थोपटे तसेच तालक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.
शुक्रवार २७ सप्टेंबरला दुपारी एक वाजता ही सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याचे सांगण्यात आले असून, कारखान्याचे संस्थापक अनंत थोपटे (मा. मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, तरी सर्व सभासदांनी सदर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी केले आहे.