पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे(aditya thakare) व भाजपाचे खासदार नारायण राणे( narayan rane) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. एकमेकांवर दगडफेक, चिखलफेक, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी जखमी झाले. दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर तणाव कमी झाला. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे( sushma andhare) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सरकारला धारेवर धरत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने उबाठा गटातील पदाधिकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काल शिवसेनेने आंदोलन केले त्याठिकाणी पोलिसांवर नारायण राणे यांचे गुंड भारी पडले. सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करतात. देहू आळंदीमध्ये वारकऱ्यांवर हल्ला केला जातो. बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले, तर पालकांना देखील लाठीचार्जला सामोरे जावे लागते. याचा अर्थ असा आहे सरकारला आंदोलन हाताळता येत नाही.
सुषमा अंधारे (नेत्या उबाठा)