भोरः शहरात युवासेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याला युना सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची विशेष उपस्थित होती. महायुतीकडून शिवसेनेचे कुलदीप कोंडे हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आता या मेळाव्यामुळे जोर पकडू लागली आहे. निवडणुकीचे काऊडाऊन सुरू झाले असून, अवघ्या ३५ दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. उमेदवार कोण हे माहित नाही, पण निशाणी धनुष्यबाण असणार हे नक्की असे सूचक विधान कुलदीप कोंडे यांनी यावेळी बोलताना केले.
३५ दिवसांमध्ये लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली तर निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे. यामुळे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन कोंडे यांनी केले आहे. तसेच महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सध्या चूकीच्या पद्धतीने नॅरेटीव्ह पसरविला जात आहे. ४५ वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली. आता आपली परिस्थिती चांगली असल्याचे व्यक्तव्य कोंडे यांनी केले.
महायुतीचा उमेदवार आमदार झाल्यावर सुवर्णकाळ
यंदाची दिवाळी फार महत्वाची आहे. सगळ्यांसाठी आनंददायी दिवाळी असून, यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार आमदार म्हणून आल्यास सुवर्णकाळ आल्याशिवाय राहणार नाही.
महायुतीचे संभाव्य उमेदवार कुलदीप कोंडे?
निवडणुकीचा पारा जसाजसा वाढू लागला आहे, तसतसे राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कुलदीप कोंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण असणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. यामुळेच महायुतीकडे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून कुलदीप कोंडेंकडे पाहले जात आहे.