जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या करिता दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. या मतदार संघातून एकूण १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. अर्ज माघारी घेतलेल्या १० उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. यापैकी बहुतांशी उमदेवार हे युतीमधील घटक पक्षाशी संलग्न आहेत.
‘या’ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला माघारी
1. दत्तात्रय मारुती झुरंगे (अपक्ष)
2. दिगंबर गणपत दुर्गाडे (अपक्ष)
3. दिलीप विठ्ठल गिरमे (अपक्ष)
4. शंकर बबन हरपळे (अपक्ष)
5. संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे (अपक्ष)
6. जगताप अभिजीत मधुकर (अपक्ष)
7. संदीप बबन मोडक (अपक्ष)
8. आकाश विश्वनाथ जगताप (अपक्ष)
9. जालिंदर सोपान कामटे (अपक्ष)
10. गणेश बबनराव जगताप (अपक्ष)