भोर : राजगड पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस असल्याचे खोटे सांगून लुटमार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यक्तीला लुटले होते त्यानुसार पोलिस आरोपीच्या शोधात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही संशयित व्यक्ती मिळून आले त्यामध्ये त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्यानी असे नाव सांगत नसरापूर येथील गुन्हा कबूल केला त्यानुसार याकुब जानशहा इराणी (वय 54, रा. फ्लॅट नं. 08, महात्मा गांधी वसाहत, शिवाजी नगर, ता. हवेली, जि. पुणे) आणि समिर हिम्मत बेग (वय 43, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेलगावी, कर्नाटक) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान राजगड पोलीस ठाणे गु. र. नं. 452/2024 अंतर्गत बी.एन.एस. 318(4), 316(2), 3(5) या कलमांतर्गत गुन्हा उघड झाला आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरदार, पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत दत्ताजीराव मोहिते, राजू मोमिण, अमोल शेडगे, दीपक साबळे, मंगेश भगत, आणि सागर नामदास या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.