भोरः येथील शिवरे गावात अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचार दौरा निमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. यंदाची निवडणूक अपक्ष लढत आहे, तुम्हा सर्वांचे मतदान रूपाने आशिर्वाद मागायला आलो आहे. भविष्यातील तुमची कामे करण्यासाठी कटिबद्ध असून, तालुक्याचा विकास करण्याकरिता सर्वांना विरोध करून मैदानात उतरलो आहे. जे काही झालं ते चांगल्यासाठीच होत असून सर्वांनी राजकीय जोडे बाजूला सारून साथ देण्याचे आवाहन अपक्ष उमेदावर कुलदीप कोंडे यांनी केले.
मी कधीही रिंग रोडला विरोध केला नाही आणि त्याचे समर्थनही केले नाही. शेतकरी देशोधडीला लागू नये. तसेच यामध्ये शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे हा प्रामणिक हेतू आहे. यामुळे ज्या काही अटीशर्ती ठेवण्यात आल्या आहेत, त्या मान्य कराव्या लागतील असे कोंडे यांनी सांगितले. मात्र, विद्यमान हे त्या लोकांना माझ्याबद्दल वेगळं सांगत आहेत. त्यामध्ये देखील राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये कसले राजकारण, असा सवाल कोंडे यांनी संग्राम थोपटे यांना केला आहे. रिंगरोडची हद्द ही नसरापूर, चिलाडी आणि कापूरव्होळ इथपर्यंत घ्यावी, अशी मागणी कोंडे यांनी यावेळी केली. सगळ्या गोष्टीत त्यांना राजकारण करायचे आहे, त्यामुळे विकास करायचं काय माहितीये त्यांना. ज्याप्रमाणे रिंग रोड हटवला म्हणून विद्यमानांनी सत्कार स्वीकारले त्याचप्रमाणे शिवरे येथील रिंग रोड बाबत देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असा टोला देखील यावेळी आमदार संग्राम थोपटे यांना अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी लगावला. विधानसभा निवडणुका झाल्यावर शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार असून, ज्या ठिकाणी शेती केल जात नाही त्या ठिकाणाहून रिंगरोड नेण्यात यावा, अशी विनंती कोंडे यांनी केली.
तुमच्या पोराची प्रॅापर्टी २५० कोटींची, ही निवडणुकीची शेवटची वेळ
सर्वसामान्यांची पोरं देखील मोठी झाली पाहिजेत ही भूमिका ठेवा. तुमचं पोरगं २२ वर्षांचं असून, त्याची प्रापर्टी २५० कोटी आहे. आमच्या पोराची बाईक देखील अजून हप्त्यावर असल्याचे कोंडे म्हणाले. तुम्ही मोठे होत असताना शेतकऱ्यांना मोठं करण्याची भूमिका ठेवा असा टोला कोंडे यांनी थोपटे यांना लगाविला. तालुक्याचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन करावा. निवडणुकीच्या मैदानात सर्वांना विरोध करून उतरलो असून, ही शेवटची वेळ असल्याने साथ देण्याचे भावनिक अवाहन कोंडे यांनी सभेच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. तुमच्या विश्वासाला तडा देणार नसल्याची ते यावेळी म्हणाले.