भोरः खा. सुप्रिया सुळे यांनी एकच वादा संग्राम दादा असे विधान केल्यामुळे महाविकास आघाडीतील उबाठा गटातील पदाधिकारी नाराज झाले असून, सुळे यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचेच असल्याचे त्यांच्या वतीने सागंण्यात आले आहे. मुळात मविआकडून अद्यापर्यंत भोर विधानसभेबाबत उमेदवाराचे नाव घोषित केले नसताना असे म्हणणे योग्य नसल्याचे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भोर विधानसभेची जागा लढविण्यासाठी जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर इच्छुक असून, त्यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे.
या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे आम्ही सर्वांनी मिळून मनापासून का केले आहे. सुप्रिया सुळे यांना या भागातून आघाडी मिळवून देण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याचे मांडेकर यांनी सांगितले आहे. यामुळे या मतदार संघावर आमचा देखील दावा आणि ताकद जास्त असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही जागा आम्हाला सोडावी, अशी विनंती करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
शिवसैनिकांना डावलेले जात असल्याचा आरोप
भोर वेल्हे या भागात त्यांची ताकद आहे, पण मुळशीत काय असा सवाला करीत शिवसैनिकांनी देखील मदत केली असल्याचे विसरुन चालणार नसल्याचे मांडेकर यांनी सांगितले आहे.
“२० वर्षांपासून राजकारण करत आहे, राजकारण करत असताना प्रत्येकाची महत्वकांशी असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद करायची आणि विधासभा करायची, त्या दृष्टीने गेले अनेक वर्ष काम करत आहे. दीड वर्षांपासून मी उद्धव ठाकरे गटात आलो आहे. आणि त्याचे वेळी ठरवले की ही जागा आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा. त्या दृष्टीने आम्ही पूर्णताकतीने काम करीत आहोत.”
– शंकर मांडेकर (जिल्हा प्रमुख उबाठा)
उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल
उबाठा गटातील अनेक जण भोर विधानसभेची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शेवटी या प्रकरणी उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेतील तो मान्य असल्याचे मांडेकर यांनी सांगितले. यामुळे भोर विधानसभेवर अनेकांवर दावा करण्यात येत असल्याचे मोठी रस्सीखेच पाहिला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.