Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कारभार (पंचनामा ) : शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टीमला आदेश…?

शिक्रापूर वनपाल गौरी हिंगणे व तळेगाव ढमढेरे चे वनरक्षक प्रमोद पाटील यांची सखोल चौकशी करण्यात येईल

by SBPRNL
September 3, 2024
कारभार (पंचनामा ) : शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टीमला आदेश…?

शिरुर:- निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव कालवडीचा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. याबाबतची माहिती शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा रेस्क्यू टिमने तातडीने पंचनामा केल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रेस्क्यू टिमला असा पंचनामा करण्याचे अधिकार आहेत का…? याबाबत शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या मध्ये रेस्क्यू टीमचे पंचनामा करतानाचे फोटो छापुन आले आहेत. पंचनामा करत असताना वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक प्रमोद पाटील हे फोटोत उपस्थित दिसत नाहीत. पंचनामा करतेवेळी गौरी हिंगणे व प्रमोद पाटील हे घटनास्थळी उपस्थित नव्हते, काही ग्रामस्थ व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मग हे अधिकारी अदृश्य पध्दतीने रेस्क्यू टिमला मार्गदर्शन करत होते का…? कि फोनद्वारे मार्गदर्शन करत होते का…? तसेच कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमची नेमणुक कोणाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. याबाबत शिरुर तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

You might also like

No Content Available

रेस्क्यू टिम म्हणजे नक्की काय…?
रेस्क्यू टिम म्हणजे स्वयंस्फूर्तीने काही तरुण पुढे येऊन वनखात्याला मदत करतात. जसे की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उचलण्यासाठी मदत करने, वन्यप्राण्यांच्या संदर्भात काही घटना घडली. तर वन अधिकारी यांच्या समवेत जाऊन मदत करणे. रेस्क्यू टिम मधील तरुणांना वनविभागाने तशी ओळखपत्र आणि गणवेश पण दिला आहे. परंतु या टिम मधील सदस्य शासकीय कर्मचारी नाहीत. तसेच त्यांना कुठलाही पंचनामा करण्याचा अथवा रिपोर्ट तयार करण्याचा, अहवाल पाठविण्याचा अधिकारही नाही अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

रेस्क्यू टिमच्या सदस्यांचे नको ते उद्योग…
शिरुर तालुक्यातील वनविभागाच्या रेस्क्यू टिम मधील एक सदस्य वनविभागाच्या अंबर दिव्याच्या गाडीत बसुन गाडी चालवतानाचा फोटो स्वतःच्या मोबाईलच्या डिपी ला ठेऊन स्वतः शासकीय वनविभाचा अधिकारी आहे असे भासवुन तालुक्यात जनमानसात तशी प्रतीमा तयार करत आहे. तसेच आपणच शिरुर तालुक्यात फार मोठे सर्पमित्र आणि प्राणीमित्र आहोत असे भासवत आहे. त्यामुळे याबाबत वनविभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.

शिक्रापुरच्या वनपाल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…?
शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांच्या कार्यक्षेत्रात यापुर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या इतरही अनेक जनावरांचे पंचनामे रेस्क्यू टिमने केल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. शिक्रापुर वनहद्दीत अनेक कोळशाच्या भट्ट्या होत्या व सध्याही आहेत. तसेच शिक्रापुर वनपाल गौरी हिंगणे यांच्या कार्याक्षेत वनविभागाच्या हद्दीतीत आलेगाव पागा आणि उरळगाव येथे राखीव वनहद्दीत जेसीबीच्या साह्याने झाडे काढुन टाकली. तसेच वनहद्दीतील शेकडो ब्रास माती हायवा ट्रकच्या साह्याने गौण खनिज माफीयांनी वनपाल गौरी हिंगणे यांच्याशी संगनमत करुन वाहुन नेली. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने उशीरा गुन्हा दाखल केला आहे. मुरुम व माती चोरीच्या वृत्तपत्रात बातम्याच प्रसिद्ध झाल्या नसत्या तर त्याबाबत गुन्हा दाखल केलाच नसता. तसेच गुन्हा दाखल होऊन सुद्धा गुन्हयात वापरलेली संपुर्ण यंत्र सामुग्री गौरी हिंगणे यांनी जप्त केली नाही. तसेच गुन्हयातील सर्व आरोपींना अटकही केलेली नाही.

वरील विषयाच्या अनुषंगाने शिक्रापूर वनपाल गौरी हिंगणे व तळेगाव ढमढेरे चे वनरक्षक प्रमोद पाटील यांची सखोल चौकशी करण्यात येईल व त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली आहे.

Tags: shikrapurvanpal
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available
Next Post
Crime News : खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या; दोघांना घेतलं ताब्यात

Crime News : खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या; दोघांना घेतलं ताब्यात

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group