जोगवडी गावातील संभाजी नारायण धुमाळ यांची कन्या कु. श्वेता संभाजी धुमाळ हिची महाराष्ट्र पोलीस ठाणे ग्रामीण विभागात निवड झाली आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत गावाचे सरपंच संतोष धुमाळ, उपसरपंच माया सावंत, सदस्य राजेंद्र धुमाळ, अश्विनी धुमाळ, माऊली सावंत, अनिता देशमुख, पोलीस पाटील उर्मिला धुमाळ, रवींद्र धुमाळ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते धनंजय धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, ओंकार धुमाळ, मंगेश धुमाळ, सचिन धुमाळ, प्रणय धुमाळ, सागर धुमाळ, शहाजी धुमाळ तसेच गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळाने तिचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्वेताचे वडील संभाजी धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गावातील सामजिक कार्यकर्त्याची मुलगी पोलीस झाल्याने गावातील ग्रामस्थांचे उर भरुन आल्याचे चित्र पाहवयास मिळाले.