भोरः यंदाची भोर विधानसभेची निवडणूक मोठी लक्षवेधी ठरली. पक्षातून उमेदवारी नाकाल्याने दोन उमेदवारांनी अपक्ष निवडणुकीचा सामाना केला. आघाडीचा उमेदवार विरुद्ध युतीचा उमेदवार अशी येथली थेट लढत असली तरी अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे आणि किरण दगडे यांच्यामुळे चौरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे इथला निकाल अनपेक्षित लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चारही उमेदवारांनी भोर विधानसभेसाठी विजयी असल्याचे सांगितले असले तरी भोरची जनता कुणाच्या बाजूने उभे राहिते यासाठी उद्या दि. २३ नोव्हेंबरची वाट पाहवी लागणार आहे. यंदाची निवडणूक देखील काही ठराविक मुद्यांवरच गाजवली आणि उमेदवारांनी देखील त्याच पद्धतीने विधाने केले. गेल्या पंचावार्षिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काही अंशीने मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसते. वाढलेला मतटक्का कोणासाठी फायद्याचा ठरणार हे देखील महत्वाचे असणार आहे.
या मतदार संघात भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांचा समावेशी आहे. भोरचे तरूण भोरच्या एमआयडीसच्या प्रश्नाची सोडवणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील मतदार आजही अनेक सोय सुविधांपासून वंचित आहेत. तर मुळशी तालुक्यातील मतदारांच्या देखील अनेक समस्या आहेत. या आणि असे काही ठराविक प्रश्न उमेदवारांच्या केंद्रास्थानी होते. कोंडे आणि दगडे यांच्या बंडामुळे थोपटे आणि मांडेकर यांच्यातील थेट लढत हुकली. यामुळे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगाणात असल्याने मतविभाजन देखील झाले. मतदारांना खूष करण्यासाठी देवदर्शन, साडीचोळी अन् धनलक्ष्मीचे आमिष इथल्या मतदारांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आकडेवारीचा विचार करता ‘असे’ होऊ शकते
या मतदारा संघात ४ लाख ३० हजार २७८ मतदार आहेत. यापैकी २ लाख ९१ हजार ७०४ मतदारांना मतदान केले. म्हणजेच सरासरी ६७.७९ टक्के मतदान झाले. राजगडमध्ये ५४ हजार ५० मतदारांपैकी ३९ हजार ९२१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ८६ टक्के मतदान झाले. मुळशी तालुक्यात २ लाख ६ हजार १४ मतदारांपैकी १ लाख २६ हजार ६०७ मतदारांनी मतदान केले. म्हणजेच ६१ टक्के मतदान झाले. या सर्व आकडेवारीवरून नजर टाकल्यास सर्वसाधारणपणे ६ टक्क्यांची वाढ यंदा झाललेली दिसते. ही वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार?