भोर – मागील काही वर्षात आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात असंख्य विकास कामे पूर्ण झाली आहेत, हा भाग धरणग्रस्त असल्याने भाटघर धरणग्रस्त नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत विकासकामांच्या जोरावर या भागातील गावांना पुष्कळ निधी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य असतानादेखील या भागातील गावात अंतर्गत बाह्य रस्ते, वीज, स्मशानभूमी , सौरदिवे, कृषी अवजारे , साहित्य अशी अनेक प्रकारची विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. जे या भागात , गावात पाच वर्षांत कधी आले नाहीत, आपले तोंड कधी दाखवले नाही ते आता निवडणुका लागल्यावर येतील गावात पाच वर्षांनी मते मागायला, त्यांनी कधी गावच्या विकासाला एक रुपया दिला नाही असे नाव न घेता टोला लावत प्रतिपादन संग्राम थोपटे यांच्या प्रचारादरम्यान बसरापुर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी शुक्रवार (दि.२५) केले.
महाविकास आघाडी प्रणित कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या भोर तालुका वेळवंड,महुडे खोरे प्रचार दौरा शुक्रवार (दि.२५) प्रारंभ झाला. यावेळी पांगारी, येथे संग्राम थोपटे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून दौरा प्रारंभ झाला. वेळवंड ,राजघर,पसुरे, कर्नवडी, म्हाळवडी ,बारे खुर्द, बारे बुद्रुक, बसरापूर , महुडे, ब्राह्मणघर, नांद, शिंद, गवडी, किवत, येवली, सांगवी, या गावात प्रचार दौरा आयोजित केला असुन भोलावडेत या दिवशीचा शेवट होणार आहे.
यावेळी रायरेश्वर विकास डोंगरी परिषदेचे सचिव बाळासाहेब थोपटे, भोर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मानसिंगबाबा धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी-विक्री संघाचे सदस्य अंकुश खंडाळे, भाटघर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष विठ्ठल वरखडे ,सचिव काळुराम मुळेकर, सुवर्णा मळेकर, वसंत वरखडे , माऊली दानवले, वेळवंड सरपंच काजल पांगुळ, बारे खुर्द सरपंच सविता गायकवाड , सागर दानवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंकुश खंडाळे , हनुमंत बदक, रामचंद्र शिंदे , ज्ञानोबा दानवले, तंटामुक्ती उपाध्यक्ष रमेश बाबुराव झांजले, दत्तात्रय पवार, चंद्रकांत झांजले, कांता झांजले, शिवाजी झांजले, बबन झांजले, जयवंत झांजले, केशव साळुंके, सुनिल साळुंके , सदाशिव झांजले ,लक्ष्मण बदक, दशरथ कुंभारकर, अनिल झांजले ,अजित पवार आदीसह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. मानसिंग धुमाळ, रविंद्र बांदल यांनींही आपल्या मनोगतात महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विजयाचा यावेळी चौकार मारून राज्यात शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.