मुंबईः महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पूर्ण होताच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात येत पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मंत्रालयात तिघांचे आगमन होताच लाडक्या बहिणींनी तिघांचेही औषण करुन फुलांची उधळून त्यांच्यावर करीत स्वागत केले. या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री साह्याता निधीच्या फायलवर स्वाक्षरी करीत पुण्यातील एका रुग्णाला ५ लाखांची अर्थसाह्याला मंजूरी दिली आहे. चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाच्या पत्नीने मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यातामार्फत मदत मिळावी म्हणून अर्ज केला होता. मंत्रालयात तब्बल ४५ मिनिटे ही बैठक सुरू होती.
कॅबीनेट मंत्री मंडळाची बैठक पूर्ण होताच देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद घेतली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. रोल बदला तरी समन्वय तोच राहणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कॅबिनेट बैठकीत दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले. योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन पुढची पायाभरणी करत राज्याला पुढ न्यायचे असल्याने सर्व क्षेत्रात गतिमान पद्धतीने काम करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.