भोरः राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक नामांकित हॅाटेल आहे. सदर हॅाटेलचे लॉजिग नावावर करु दे, असे म्हणत पुतण्याने काकाला धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय अनिल पवार (वय 33 वर्ष), ईश्वरी अक्षय पवार, गौरव वाघमारे (पुर्ण नाव माहित नाही) सर्व राहणार पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निवृत्ती हरिचंद्र पवार (वय ५२) यांनी या प्रकरणी राजगड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. सदर घटना 25 सप्टेंबर रोजी येथील प्रसिद्ध हॉटेलमधील बिअर बारमध्ये घडली आहे.
डोक्यात फोडली दारुची बाटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे सारोळा गावच्या हद्दीमध्ये एक हॅाटेल आहे. फिर्यादी हे परमिट रूमच्या काउंटर खुर्चीवर बसलेले असताना, यातील आरोपी अक्षय अनिल पवार, ईश्वरी अक्षय पवार, गौरव वाघमारे यांनी संगनमताने येथे आले. अक्षयने काकाला जिवे मारण्याच्या उददेशाने काउंटरवर असलेली अर्धी भरलेली दारुची बाटली काकाच्या डोक्यात फोडली. त्यानंतर यामुळे फिर्यादी हे खाली कोसळले. यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत हाताने फिर्यादीचा यांचा गळा आवळून त्यांना जिवे मारण्याचा प्रत्यन करण्यात आला. यावेळी ईश्वरी पवार हिने चेथावणी देवून गौरव वाघमारे याने जो कोणी भांडणे सोडविण्यासाठी येईल त्याला देखील आम्ही जिवे मारु, अशी धमकी दिली. यावरुन पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिवे मारण्याचा केला प्रयन्न
फिर्यादी यांचा हॅाटेल बार आणि लॅाजिंगचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते आपल्या हॅाटेलमध्ये होते. २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय पवार हॅाटेलमध्ये येऊन हॅाटेलचे लॅाजिंग नावावर करुन देत नाही या कारणावरुन शिवीगाळ करु लागला. यामुळे निवृत्ती पवार यांनी राजगड पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांचा पुतण्या, त्याची पत्नी आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती त्या ठिकाणी आले. यावेळी फिर्यादी हे काऊंटरवर बसले होते. काऊंटरवर असलेल्या अर्ध्या भरलेल्या दारुची बॅाटल आरोपी अक्षय याने त्यांच्या डोक्यात फोडली. यावेळी ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना लाथबुक्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपीने त्यांचा गळा दाबून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीच्या पत्नीने त्याला मारुन टाक, अशी चिथावणी दिली.
फिर्यादी यांच्या मुली भांडणात पडल्या नाहीतर…..
त्यानंतर या भांडणात हॅाटेलमधील एक वेटर मध्ये आल्याने त्याला देखील शिवीगाळ करुन बाजूला ढकलले. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या गौरव वाघमारेने जर कोणी मध्ये पडले तर त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी फिर्यादी यांच्या दोन्ही मुली धावून आल्या आणि त्यांनी वडिलांंना आरोपींच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात दाखल केले. यामुळे पुढे होणार मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करीत आहेत.