भोरः जय भवानी तरुण मंडळ वांगणी आयोजित सामाजिक शिक्षण उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना गुड टच , बॅड टच बाबतीत प्रशिक्षण देण्यात आले. समाजामध्ये वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या धर्तीवर विद्यार्थिनी, युवती यांना मुस्कान फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वांगणी, वांगणीवाडी, निगडे बु. कातवडी, कोळवडी, मांगदरी आणि पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थिनी आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून मंडळाच्या वतीने करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आणि उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या नियोजन वांगणीचे मा. सरपंच विजय बाप्पू चोरघे, मा. सरपंच धनंजय नाना ननावरे, मा. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कृष्णा चोरघे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भरत रामदास चोरघे, सामाजिक कार्यकर्ते संतोष चोरघे यांनी केले होते. विद्यार्थिनीच्या भोजनाची व्यवस्था गोरक्षनाथ प्रकाश चोरघे (फौजी) यांनी केली होती. कार्यक्रमासाठी जय भवानी तरुण मंडळ वांगणी समस्त ग्रामस्थ वांगणी यांचे मोठे सहकार्य लाभले.