बारामतीः राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्याकडून अजित पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांच्या विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळणार आहे. अजित पवार हे बारामती विधानसभेसाठी निवडणूक लढविणार नाहीत अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमात फिरत होते. मात्र अजित पवार यांच्या नावावर शक्का मोर्तेब करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. एकूण ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा करण्यात येत होती. अखेर त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्का मोर्तेब करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध भागातील लोकसभेच्या निवडणुकीनंतर युगेंद्र हे स्वःताह गावभेट दोऱ्यांच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत होते. त्यांच्या नावाचे बॅनर्स देखील येथील विविध भागात लावण्यात आले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या नावांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे लोकसभेनंतर पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
हडपसरमधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून बापू पठारे, आंबेगाव देवदत्त निकम यांनी संधी मिळाली आहे.