पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर(vanaraj andekar) यांच्यावर नाना पेठतील एका ठिकाणी गोळ्या झाडल्याचे धक्कादायक घडली आहे. तसेच त्यांच्यावर कोत्याने वार करण्यात आल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर आंदेकर यांना नजीक असणाऱ्या केइएम रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना डॅाक्टारांनी मृत घोषित केले आहे. एका माजी नगरसेवकावर गोळी झाडल्याचे घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर त्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली होती. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. शहरात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, अशाप्रकारची गंभीर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.