भोरः राजगड ज्ञानपीठाचे कॉलेज (rajgad dyanapeth) ऑफ फार्मसीने गणेशोत्सवा निमित्ताने इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची गर्दी होत आहे. गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी येथे करण्यात आले. गणेशोत्सवाचे यंदाचे हे २४ व्या वर्ष असून, गणपती सजावटीसाठी संपूर्णपणे कागदाचा तसेच झाडांच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
भव्यदिव्य मोर, वृक्ष तसेच तुळजाभवानी देवीची प्रतिकृती हे सजावट मुख्य आकर्षण आहे. तसेच महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. हा देखावा तयार करण्यासाठी अंतिम वर्ष पदवी विभागाची विद्यार्थिनी वसुंधरा भंडारे व इतर सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला असून प्रा. कोरे, डॉ. भगत, डॉ. कर्डिले, डॉ. सोनवणे, प्रा. भिसे, प्रा. आदक, प्रा. बोराटे, प्रा. शिंदे, प्रा. फाजगे आणि सांस्कृतिक समन्वयक प्रा. कुंजीर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. राजगड ज्ञानपीठ कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व मानद सचिवा स्वरूपा थोपटे यांनी देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत.