भोलावडेत श्रीनाथ अभ्यासिका सुरू; तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद
वाचन केल्यास योग्य वेळी तरुणांना योग्य ती दिशा मिळते. वाचनाने आपली संस्कृती विकसित होऊन स्पर्धा परीक्षेची चळवळ यशस्वी होते ही चळवळ अखंडित सुरू राहण्यासाठी येणाऱ्या काळात प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजली पाहिजे सध्याच्या मोबाईलच्या विज्ञान युगात वाचाल तरच आपण वाचाल असे मत भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी व्यक्त केले.
भोर शहराच्या नजिक असणाऱ्या भोलावडे (ता .भोर) येथे ग्रामपंचायत यांच्या सहकार्य श्रीनाथ अभ्यासिकेचे उद्घाटन गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, उपसरपंच रेश्मा आवाळे , ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे , वनविभागाचे वन परिमंडल अधिकारी सुग्रीव मुंडे, संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुदाम ओंबळे, जेष्ठ पञकार भुजंगराव दाभाडे , वनरक्षक की एम हिमोणे, साक्षी शिंदे , संचालक मोनेश पवार ,प्रा.नारायण वाघ , प्रा.सुनिल चोरघे , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,शधनवाडे पुढे म्हणाले की, पंचायत समितीच्या शेष फंडातून ५० हजार रुपये अभ्यासिकेला देण्याचे जाहिर केले. तसेच गावातील वनपाल शकुंतला गोरे, समीर जाधव, शुभम कडू, मुंबई पोलीस रोहन गुरव, राज्य उत्पादन शुल्क विभागातील मोनिका जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता लोहकरे तर आभार शुभांगी रणखांबे यांनी मानले.