भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: शहरात सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. मंगळवार हा दिवस आठवडे बाजाराचा दिवस असल्याने शहरात गर्दी दिसून येत होती.अशातच दुपारी अडीचच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली.हा पाऊस एवढा मोठा व प्रचंड होता काही क्षणातच अनेक भाजीपाला विक्रेते वर्गाची पुरती धांदल उडाली.
त्याचा विक्री साठी आणलेला भाजीपाला, टोमॅटो,लिंबे पावसाच्या पाण्याच्या लोटात वाहुन गेले.
भाजीपाला विक्रेते व्यापा-यांची पुरती दैना झाली. बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता अशा मुसळधार पावसाने मात्र शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. भात पिक जीवंत रहाण्यासाठी असा पाऊस उपयुक्त असल्याचे शेतक-यांकडुन सांगण्यात आले आहे.