भोरला – कोणताही महत्वाचा सण आला की मोबाईल कंपन्या आपापले नवनवीन हँडसेट बाजारात घेऊन येतात त्यातच नवनवीन ऑफर देऊन ग्राहक राजा कसा आकर्षित होईल याकडे कटाक्षाने लक्ष देतात या दिवाळीतही अशाच प्रकारे मोबाईल कंपन्यानी अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन सुविधा, लकी ड्रॉ, आकर्षक गिफ्ट, जूना फोन देऊन नवीन फोन तसेच विविध फायनान्स कंपन्या मार्फत झिरो डाऊन पेमेंटवर विविध स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करून देत आहे अशातच सर्वांचा आवडता दिवाळी हा महत्त्वाचा मोठा सण असल्याने या सणाला भोरला मोबाईल दुकानात गर्दी उसळली असून या सणाला मोबाईल खरेदीला नागरिकांनी अधिक पसंती दिली आहे
नवनवीन फायनान्स कंपन्यांनी मोबाईल खरेदीसाठी विशेष सवलती दिल्याने लोकांचा मोबाईल खरेदीकडे कल वाढला आहे. अनेक मोबाईलच्या कंपन्यांनीही वेगवेगळे आकर्षक मॉडेल्स बाजारात कमी अधिक किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. तसेच मोबाईल दुकानदारांनी ठराविक किंमतीच्या मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देऊ केल्याने मोबाईल खरेदीलाच अधिक पसंती मिळत आहे अलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदीचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे नूकसान लोकांच्या लक्षात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूबाबत स्थानिक बाजारपेठेतील दुकानांना अधिक पसंती मिळत आहेत.कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्या लागलीच बाजारपेठेतील दुकानदाराकडुन दूर होत आहेत. कोणत्याही कंपन्यांच्या मोबाईला कोणताही प्रॉब्लेम आला तर लागलीच त्याची दखल घेतली जात असुन ऑनलाईन पेक्षा स्थानिक दुकानात खरेदी अधिक दिलासादायक आहे असे भोर शहरातील माबाईल विक्रेते प्रमोद शेटे ,अमित ओसवाल, अमर ओसवाल , शिरीष चव्हाण , तुषार शिंदे, अक्षय शेटे, शुभम ओंबळे ,अमित शेटे यांनी सांगितले.

















