पुणेः एका २२ वर्षीय मुलाने त्याच्या मैत्रिणीला वाढदिवसी असल्याने अज्ञात स्थळी नेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्याने पीडित अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी संबंधितांवर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही २२ जुलै २०२४ रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय आरोपी मुलगा आणि पीडित १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. २२ जुलै रोजी पीडित मुलीचा वाढदिवस होता. या दिवशी आरोपी मुलाने तिला तुझा वाढदिवस आहे म्हणून दूर जाऊ असे म्हणत पार्किंग असलेल्या एका खोलीत नेले. तिथे पीडितेला तुझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट पाहिजे असे म्हणत पीडितेसोबत अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला.
तसेच शरीरसुखाची मागणी केली. यावेळी पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिला मिठी मारली. याबद्दल कोणाला काही सांगितलं. तर तुझे वडील मरतील अशी धमकी दिली. यानंतर पीडितेने फरासखाना पोलीस ठाणे गाठत सबंधित मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल काळे हे करीत आहेत.